पंढरपूर/प्रतिनिधी
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता.
त्या शेतकऱ्यांनी एकूण ७५२ हेक्टर क्षेत्रावर हा फळ पिक विमा भरला होता यामध्ये द्राक्षासाठी ३०५ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना १ कोटी ८९ लाख २४ हजार २२७ रुपये मंजूर झाले आहेत आंबा उत्पादक ३५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये तर डाळिंब उत्पादक ६६४ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये मंजूर झाले आहेत असा एकूण १००४ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आंबे बहार फळपीक विमा मंजूर झाला असून ही मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.