असा पार पडला श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा….!
पहाटे 4.00 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची नित्यपुजा अनुक्रमे व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख श्री.संजय कोकीळ यांच्या शुभहस्ते संपत्नीक संपन्न झाली.
सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री.रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि शुभ्र अलंकार परिधान करण्यात होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
दुपारी 12 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजा सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, एडवोकेट माधवी निगडे, ह भ प प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते पार पडली.
त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला. दुपारी 4.00 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजा व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते पार पडली. सायंकाळी 5.00 वाजता दोन्ही उत्सव मूर्तीची प्रदक्षिणा मार्गावरून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन, मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन, मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, युट्युब व फेसबुक यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो भाविकांनी घरबसल्या सोहळा अनुभवला. या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्या शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, एडवोकेट माधवी निगडे, ह भ प प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड उपस्थित होते. सदरचा सोहळा पार पाडण्यासाठी सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
या विवाह सोहळ्याची मंगलाष्टका मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटली.
या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्या शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, एडवोकेट माधवी निगडे, ह भ प प्रकाश जवंजाळ व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
फुलांची आरास
पुणे येथील दानशुर भाविक श्री.भारत दिलीप भूजबळ यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास केली आहे. त्यासाठी 5000 ते 6000 किलो फुलांचा वापर केला असून, त्यामध्ये प्रामुख्याने झेडू, अष्टर, चेरबिरा, गज-यांचा वापर केला आहे.
अन्नदान येणा-या सर्व भाविकांना श्री.संत तुकाराम भवन येथे भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे 5000 भाविकांनी लाभ घेतला आहे. यासाठी इंदापूर व बीड येथील दोन भाविकांनी नाव न छापण्याच्या अटीवर 3 लक्ष किमतीचे अन्नधान्य व भाजीपाला उपलब्ध करून दिला होता. तसेच पंढरपूर येथील प्रशांत खलिपे, शंकर कदम व सोलापूर येथील शिवकन्या बालाप्रसाद ओझा यांनी अर्धा लिटरच्या 5000 नग पाणी बॉटल मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. या भोजन प्रसादामध्ये पुलाव भात, गुलाब जामून, पुरी, छोले बटाटा भाजी, आमटी, कांदा भजी, पापड, शेव इत्यादी पदार्थाचा समावेश होता. आणि हो, बसण्यासाठी भारतीय बैठक व्यवस्था, पर्यावरण पूरक द्रोण- पत्रावळी, सिलबंद बॉटलमध्ये मिनरल वॉटर.