पंढरपूर तालुक्यातील कासेगांव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.शोभाताई शिवाजी भोसले यांची बिनविरोध निवड.
पंढरपूर/प्रतिनिधी
कासेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच रिजवाना भालदार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या जागेसाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख गटाच्या सौ.शोभाताई भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोरे, ग्रामविकास अधिकारी रमेश कोळी यांनी काम पाहिले.
यावेळी आबासाहेब देशमुख, तैमूरशह इनामदार, दिलावर मुलानी,हरिभाऊ फुगारे, रामचंद्र यादव, प्रकाश रुपनर, रामचंद्र यादव, औदुंबर निकम, तानाजी कापसे, बाळासाहेब शेख, संजय वाघमारे, हंसराज देशमुख, दाजीसाहेब देशमुख, शिवाजीराव भोसले,बंडू शेख
,शिवाजी पडळकर,शामराव घोडके,दिलीप निकम, शब्बीर इनामदार,जहांगीर शेख, युसुफ शेख, संजय घायाळ, उपसरपंच संग्रामसिंह वसंतराव देशमुख आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन सरपंच सौ. शोभाताई भोसले यांचा सत्कार मा.जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.