मंदिर बांधकामाचा राजू खरे यांच्या हस्ते नारळ फोडत कामाला झाली सुरुवात
मोहोळ मतदार संघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावांमध्ये राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचं मंदिर बांधून देण्यात यावे. अशी मागणी ग्रामस्थांनी राजू खरे यांच्याकडे केली.
अन अवघ्या काही दिवसातच स्वखर्चातून मंदिराचा बांधकामाचा नारळ फोडत कामाला सुरुवातही झाली. ऐकणारे किंवा पाहणारे आश्चर्यचकित झाले, कारण राजू खरे यांना काल बोललो आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली, हे पाहून इतर नागरिकही अवाक झाले, त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही, तर ते शब्दांचा पक्का असणारा नेता असे म्हटले गेले, याचाच प्रत्यय संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहुन अनुभवला, संपूर्ण राजकारणात राहून ‘माणूस’ पण जपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात असताना दिसून येत आहे. राजकारणात राहून मुखवटा न लावणारे खूप कमी असतात अशे अनेक प्रसंग तालुका पाहत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं देखील बोलले जात आहे.
या कार्यक्रमावेळी जय मातोश्री पतसंस्थाचे चेअरमन रामहरी भोसले, कल्याण भोसले,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे, रंगनाथ गुरव, नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे, ज्योतीराम गोडसे, संजय मस्के,समाधान बाबर,नवनाथ आसबे, चिंतामणी भोसले, राज दिघे,विनायक भोसले,संभाजी पवार,नागेश भोसले, अंबादास पवार, सिद्धेश्वर माने, ऋषिकेश दिघे,भाऊ शिंदे, सिद्धेश्वर लोखंडे-पाटील, अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.