नवीन चिन्ह तुतारी घेऊन आ.रोहित पवार विठ्ठल चरणी
पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रात जातिवाद,धर्मवाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
याचा विरोध नवीन चिन्ह घेऊन करणार आहोत. यासाठी विठोबाच्या चरणी तुतारी ठेऊन आशीर्वाद घेतला असल्याचे आ.रोहित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्या नंतर ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आली होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, शहराध्यक्ष सुभाष भोसले आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.रोहित पवार म्हणाले की राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार वाढला आहे.
वर्षा बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी आहे. आमदारांना वाचवण्यासाठी आहे. कुटुंब फोडण्यासाठी आहे. मात्र गरीब कुटुंबांसाठी नाही.
देवेंद्र फडणवीस हे २०१४ ला मुख्यमंत्री झाल्या पासून एकता, समानता नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला आहे. भाजप एकच पक्ष राहिला पाहिजे असे वारंवार सांगत आहेत. देश हुकूमशाहीकडे घेऊन निघाले आहेत.
वादावर चर्चा केली जाते. कुटुंब फोडण्याचे, पक्ष फोडण्याचे काम पैशाच्या बळावर केले जात आहे. शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे प्रश्न कायम आहेत. याला सर्वश्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याची टीका केली.
अशी टीका आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
यावेळी त्यांनी नितेश राणे सेलिब्रिटी नेता आहे. पोलिसांची किंमत करत नाही. सामान्यांची किंमत करत नाही. त्यांना पद पाहिजे यासाठी ते बोलत असतात. याला मी महत्त्व देत नाही. अशा शब्दात रोहित पवार यांनी राणे पिता-पुत्रावर टीका केली.
ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार या पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर पंढरपुरात विठोबा चरणी आशीर्वाद घेण्यासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.