सध्या मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांची एक वेगळीच क्रेझ तयार होताना दिसून येते आहे. आतापर्यंतच्या इतिहासात जे इतर राजकीय नेत्यांकडून कधीही घडलं नाही ते मात्र सध्या मोहोळ मतदारसंघात घडत आहे.
कोणतेही पद नसताना सामाजिक दृष्टिकोन ठेवून मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शिक्षणक्षेत्र असो अथवा वैद्यकीय क्षेत्र असो उत्तर फक्त एकच शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे हे असेच म्हणावे लागेल.कारणही तसेच आहे.
मोहोळ तालुक्यातील पाटकूल या गावात एक सामान्य कुटुंबातील नागरिकाला काबाडकष्ट करून आपल्या घरचा उदरनिर्वाह करत असताना मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज भासली असता त्याच गावातील जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी तत्काळ राजू खरे यांच्याकडे संपर्क केला असता त्या कुटुंबाच्या सदस्यांना खरे यांनी भेटण्यासाठी बोलावले.
यानंतर त्या कुटुंबातील सदस्य राजू खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर भेट दिली असता त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत सौ.तृप्तीताई खरे व राजू खरे यांनी तत्काळ त्यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्त केली.यामुळे त्या कुटुंबातील मुलीचे लग्न पार पडले. या लग्नाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच आनंद दिसून येत होता.
राजकारनाच्या पलीकडे जाऊन खरे यांनी मदत केल्याने संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे, तसेच त्या कुटुंबाने आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या फायनान्सकडे जाऊन आल्यानंतरही काही कागदोपत्रामुळे अडचणी येत गेल्या मात्र योग्य वेळी राजू खरे धावून आल्याने साक्षात पांडुरंगानेच मदत केली असल्याचे म्हणत खरे यांचे सदर कुटुंबाकडून आभार मानण्यात आले.