गोपाळपूर येथे दिग्गज नेते येणार एकाच व्यासपीठावर
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवार दि.२ मार्च २०२४ रोजी होणार आहे.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
पंढरपूर येथे होत असलेल्या यात्रा आणि त्याचा गोपाळपूर याठिकाणी होत असलेला मोठा प्रभाव यामुळे याठिकाणी मोठी इमारत असणे आवश्यक होते. याबाबत मोहोळ विधासभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिदे, आ. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. या इमारतीचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे आणि मा.आ. प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमास आ. समाधान आवताडे, श्री.विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जि.प चे अतिरिक्त सी ई.ओ संदीप कोहिनकर, सां बा. विभागाचे कार्यकारी अभियंता निमकर, मा.जिल्हापरिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वरीचे संस्थापक सचिव डॉ.बी पी रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, बाजार समितीचे उप सभापती राजूबापू गावडे, जिल्हा परिषद अधिकारी इशाधीन शेळकांदे, श्रीमती स्मिता पाटील, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, युवा नेते प्रणव परिचारक, गोपाळपूर तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी आसबे, उप अभियंता लवटे, मिटकरी, पवार, दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, शाखा अभियंता लोटके आदीसह मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रमासाठी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच विलास मस्के, ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी केले आहे.
रस्त्यासाठी दीड कोटीचा आणला निधी
उद्योजक राजू खरे हे मोहोळ मधून निवडणूक लढविणार आहेत. मात्र गोपाळपूर याठिकाणी त्यांचे मोठे फार्महाऊस आहे.
त्यामुळे गोपाळपूर ग्रामस्थ यांचेकडून या भागातील रस्ते आणि विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी खरे यांचेकडे मागणी करत असतात. यामुळे खरे यांनीही या ग्रामसचिवालय ईमारतीसह भागातील पंढरपूर, मंगळवेढा या रस्त्यापासून स्वेरी कॉलेज पर्यंतच्या रस्त्यासाठीही दीड कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. याची कामे लवकरच सुरुवात करण्यात येणार आहेत.