पंढरपूर भागातील बेरोजगारांचा संतप्त सवाल
पंढरपूर / प्रतिनिधी
सध्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वत्र नमो महा रोजगार मेळावा भरवत आहे या महारोजगार मेळावा च्या माध्यमातून काही बेरोजगार कुशल अर्ध कुशल तरुणांना नोकरी मिळण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे. वर्षाला दोन कोटी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याची अभिवचन सरकारने दिलेले होते परंतु हे शक्य झाले का? हा देखील तरुण बेरोजगारांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे
आता शासन बेरोजगार तरुणांचा रोष ओढून घ्यायला नको म्हणून सरकार सर्वत्र महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करीत आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये दोन्ही तालुक्यातील काही गावे मोहोळ माढा तसेच सांगोला या मतदारसंघांमध्ये विभागले गेल्यामुळे या पंढरपूर तालुक्याला चार ते पाच आमदार लाभल्याचे दिसून येते. तसेच दोन खासदार देखील लाभल्याचे दिसते. पंढरपूर मंगळवेढा या परिसरामध्ये इंजीनियरिंग सारख्या शैक्षणिक संस्था या पाच असून तसेच आयटीआय सारखे प्रशिक्षण केंद्र देखील आहेत. या कौशल्य धारक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. या इंजिनिअरिंग तसेच आयटीआय मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुन्हा मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. परंतु पंढरपूर सारख्या शहरांमध्ये तसेच आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये उच्च शिक्षणाची सोय झालेली आहे. परंतु या उच्च शिक्षणाचा तसेच प्रशिक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या माध्यमातून व्हायला हवे होते. परंतु तसे चित्र या पंढरपूर शहर तालुका व आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून येत नाही. तरी महाराष्ट्र सरकारने पंढरपूर या परिसरामध्ये नमो महा रोजगार मेळावा चे आयोजन करून या परिसरातील बेरोजगार कुशल अर्धकुशल युवकांच्या हाताला काम मिळण्याचे आयोजन सरकारने करावे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आग्रही होऊन असा नमो महा रोजगार मेळावा पंढरपूर शहरात भरवावा असे असंख्य बेरोजगार तरुणांच्या संवादामधून त्यांचे मनोगत ते व्यक्त करीत आहेत.