पंढरपूर येथे स्वराज्य साप्ताह निमित्त निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वराज्य साप्ताहाच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री दुर्गा शिशुविहार व प्राथमिक विद्यालय इसबावी येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश अधटराव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाले प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कल्पना मांडण्याचे तसेच आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळत असते या निबंध स्पर्धेच्या प्रमाणेच भावी काळामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये देखील त्यांनी यश मिळवण्याचे कौशल्य या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मिळत असते तरी या शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेच्या लिखाणाबरोबरच स्पर्धा परीक्षा या कशा पद्धतीने असतात व त्या कशा पद्धतीने अभ्यास करून द्यायच्या असतात व त्यामध्ये उत्तीर्ण कसे झाले पाहिजे याचे देखील मार्गदर्शन शिक्षकांनी करावे. अशी अपेक्षा यावेळी दीपकआबा साळुंखे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने हा स्वराज्य साप्ताह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे संकेत ढवळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष शुकुर बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव,सतीश शिंदे, सुनील जाधव,डॉक्टर संतोष जोशी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध उपक्रम तसेच विकास कामे ही सर्वसामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जात आहे.
असे मनोगत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी या निबंध स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरणाच्या समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केले.