मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी विठू माऊलीला निवेदनाद्वारे समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी घातले साकडे
पंढरपूर/प्रतिनिधी
आतापर्यंत आपण विठ्ठलाच्या चरणी एखादी शुभ कार्य करताना पूजा करून मनोभावी पार्थना करत लग्न पत्रिका अथवा कोणतेही प्रकारची शुभ पत्रिका ठेवून विठ्ठलाला साकडे घालतो,
मात्र पंढरपूर शहरामध्ये चक्क विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी विठ्ठलालाच निवेदनाद्वारे साकडे समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी घातले आहे.त्यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत.देवापुढे निवेदन ठेवण्याची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित आपण पहिल्यांदाच पाहत असाल याला कारणही तसेच आहे.
मंदिर समितीने कंत्राटी कर्मचारी पुरवण्याबाबत टेंडर काढले आहे. त्यामुळे सध्या सेवेत असणारे पंढरपूर येथील स्थानिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये व तुझा गाभाऱ्यातील कर्मचाऱ्यांना तूच न्याय देऊन खाजगी टेंडर काढणाऱ्या अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे असे साकडे समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्याकडून विठ्ठलाला घालण्यात आले आहे.