सोलापूर अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मोठा फटका बसेल !
भाजप जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी यांना दिले निवेदन
विविध पक्षांच्या नेत्यांनाही धाडल्या निवेदनाच्या प्रति
सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी राखीव मतदार संघ असून सामाजिक द्रष्ट्या मागास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदार संघातून भाजप कडून उत्तम जानकर हे हिंदू खाटीक या जात दाखल्याच्या आधारे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होत आहे. वास्तविक पाहता उत्तम जानकर यांच्याकडे जरी हिंदू खाटीक जाता प्रमाणपत्र असले तरी त्यांचा आणि हिंदू खाटीक समाजाचा दुरान्वयेही कधी संबध आला नाही.सदर राजकीय नेते उत्तम जानकर आणि आमच्या हिंदू खाटीक समाजात कधीही संपर्क नसून त्यांचा किवा त्यांच्या पुर्वजांचा आमच्या हिंदू खाटीक समाजाशी समाज परंपरेने कधीही रोटी-बेटी व्यवहार झालेला नाही,उलट उत्तम जानकर हे गृहस्थ धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यात ओळखले जात आले आहेत.उत्तम जानकर यांचा आणि आमच्या हिंदू खाटीक समाजाचा सगे सोयरे या नात्याने दुरान्वयेही संबंध नाही.ते खोटे कागदपत्रे हस्तगत करीत राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने आमच्या जातीचे असल्याचे सिध्द करु पहात आहेत.त्यामुळे उत्तम जानकर यांच्या विषयी आमच्या हिंदू खाटीक जातीत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.तरी सदर उत्तम जानकर यांना अनुसुचीत जाती हिंदू खाटीक जात दाखल्याच्या आधारे उमेदवारी देऊ नये अशी मागणी सकल हिंदू खाटीक समाजाच्या पदाधीकाऱ्यांनी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेत निवेदना द्वारे केली आहे.
हिंदू खाटीक समाजाचा सगे सोयरे या नात्याने दुरान्वयेही संबंध नाही.ते खोटे कागदपत्रे हस्तगत करीत राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने आमच्या जातीचे असल्याचे सिध्द करु पहात आहेत.त्यामुळे उत्तम जानकर यांच्या विषयी आमच्या हिंदू खाटीक जातीत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.सोलापूर जिल्हयात हिंदू खाटीक समाजाचे सुमारे १ लाख र मतदार आहेत.जर भाजपकडून हिंदू खाटीक या जात दाखल्याच्या आधारे उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली गेल्यास त्याचा मोठा फटका भाजपास बसेल असा इशाराही देण्यात आला आहे.हिंदू खाटीक समाजातील ७ वर्षाच्या बालिकेवर अत्याचाराची घटना नुकतीच लातूर जिल्ह्यात घडली होती.राज्यभरात हिंदू खाटीक समाजाने निषेध मोर्चे काढले तेव्हा उत्तम जानकर हे मौन बाळगून होते,ते समाजाच्या या आक्रोशात का सहभागी झाले नाहीत असा सवालही उपस्थित करण्यात आला.
हिंदू खाटीक समाजाच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी याना समाजाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री चंदकांत पाटील आदींनीही निवेदने पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.याच बरोबर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र ताठे,उपाध्यक्ष सतीश खडके,सचिव राजेश ताठे,कार्याध्यक्ष भीमाशंकर इंगोले,खजिनदार शामराव बेदरे,अनिल इंगोले,गणेश जवारे,रवींद्र इंगोले,गणेश ताठे,संतोष ताठे,सुभाष जवारे,रमेश ताठे,सुनील ताठे,सुनील खडके,सागर खडके,सूरज खडके,अनिल खडके,सतीश जवारे,वैभव इंगोले,शुभम ताठे,विशाल इंगोले,संजय ताठे,विकी ताठे,प्रज्वल खडके,नितीन खडके,विश्व्जीत इंगोले,हरिकिशन इंगोले,अशोक ताठे,शशी ताठे,प्रवीण खडके,रोहित ताठे,उमेश ताठे,नागेश ताठे,रोहित ताठे,अभिजित ताठे,धनंजय सदानंदे,प्रेमचंद हाताळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.