पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत येथील श्री विठ्ठल मंदिर समिती भक्तनिवास शेजारी,भक्ती मार्ग रोड येथील नियोजित जागेवर संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास बहुजन समाजातील बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती अध्यक्ष नागेशभाऊ यादव, उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी केले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याबाबत अनेक दिवसांपासून साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू होता. याला अखेर यश आले असून लवकरच पंढरपुर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होणार असल्याने बहुजन समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.