महिला दिनाचे औचित्य साधत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा निर्णय
पंढरपूर /प्रतिनिधी
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी १३३ वा भीम जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करीत साजरा केला जाणार असून यासाठी पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या प्रतिष्ठानच्या बैठकीत विविध पदाधिकारी निवडीची घोषणा संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.ज्ञानेश्वर कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक विलास जगधने,अनिल ननवरे सर उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत,अध्यक्ष वंदना कसबे,सचिव सोहन जैसवाल,सहसचिव प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,कार्याध्यक्ष राबिया शेख,विनोद धुमाळ,स्वागताध्यक्ष अजिंक्य देवमारे,उपाध्यक्ष रिहाना आतार,नूरजहाँ फकीर,शरीफा पठाण,रोहित जाधव,इकबाल फकीर,विकी कांबळे तर खजिनदार पदी प्रतीक कुंभारे,सहखजिनदार संतोष खिलारे,निमंत्रक प्रथमेश सर्वगोड,लखन जाधव,संघटक आदम बागवान,रोहित माने,सोमनाथ सोनवले,प्रसिद्धी प्रमुख मयूर शिंदे,अमित जाधव,सल्लागार नितीन काळे,अण्णा धोत्रे,प्रा.डी.बी.कांबळे,सुरेश नवले,प्रा.गायकवाड सर यांची निवड करण्यात. यावेळी सुहास जाधव,छाया गडेकर,सिंधू चव्हाण,रुबाबबी शेख,मंगल जरग,लेखन सोनवणे,आकाश बनसोडे,दुर्गेश आराध्ये,डॉ.एस.एस.पाटोळे,रामहरी,वाडे,दुर्गेश आराध्ये,चैतन्य सर्वगोड,गणेश काळे,दत्तात्रय कांबळे,संजय सातपुते,संदेश कांबळे,अमित खिलारे,विकास वाघमारे,सुरेश पावले,जुनेद बागवान,पप्पू जैसवाल,चेतन साळूंखे,अक्षय लोखंडे यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.