पंढरपूर तहसील कार्यालय व समाजसेवक लखन चौगुले मित्र मंडळाचा उपक्रम
पंढरपूर/प्रतिनिधी
नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंढरपूर येथील जुनी वडर गल्ली, समाज मंदिर येथे विशेष शिबिराचे आयोजन महास्वराज्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने व समाजसेवक लखनदादा चौगुले यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करून करण्यात आले.
यावेळी दयावान ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विविध शासकीय लाभाच्या योजना व पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र, वृद्ध अवस्था पेन्शन योजना, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, शैक्षणिक विभागाच्या योजना, आधार कार्ड, मतदान कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, विधवा घटस्फोट महिलांना पेन्शन योजना यासह विविध शासकीय लाभाच्या योजनेचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन महाराजस्व अभियान अंतर्गत पंढरपूर कार्यालय व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.