पंढरपूर/ प्रतिनिधी
गेल्या 50 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य सरकराने मंजूरी दिली आहे. आज (बुधवार) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला.यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली. या योजनेला मंजूरी मिळताच मंगळवेढ्यात अवताडे समर्थकांमधून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आमदार समाधान दादा अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अवताडे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी स्वर्गीय भारतनाना भालके नंतर पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासाच्या दूरदृष्टीने आमदार अवताडे यांचा झेंडा हाती घेतलेल्या समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी या योजनेची मंजुरी मिळताच आमदार समाधानदादा अवताडे यांना कॉल करून तसेच मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आभार मानले.