विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर संत नामदेव पायरी येथे पुष्पहार अर्पण करून विजयाचे विठ्ठलाला साकडे घालून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील पहिल्याच यादीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झालीय.त्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास टाकला आहे.
तर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोश साजरा केला.
यावेळी पंढरपूर येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे,भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा प्राजक्ता बेणारे, इस्कॉन मंदिराचे श्रीपाद प्रभू, आळंदी संस्थानचे निवृत्ती महाराज, सतिश साठे,हभप नामदेव महाराज नागणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिली आहे.