मोहोळ मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजाभाऊ खरे यांना मोठे पाठबळ
पंढरपूर/प्रतिनिधी
मोहोळ मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, आमदार भरतशेठ गोगावले, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून ६० रस्त्यांसाठी १० कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राजू खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना राजू खरे म्हणाले की अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या आनगरकरांनी दडपशाही तानाशाही करून मताचे राजकारण केल्याने अनेक गावांचा विकास अद्यापही झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मागील काही काळात मोहोळ मतदार संघातील विकासासाठी ६ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि चालू १० कोटी २४ लाख मंजूर झाली आहेत. पुढील काळातही मोठा निधी मोहोळ मतदार संघाच्या विकासासाठी मिळवूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास मोहोळ मतदार संघातील जनतेला दिला.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी
मोहोळ मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी अवघ्या काही दिवसातच रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, आमदार भरतशेठ गोगावले, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री गिरीश महाजन, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मोहोळच्या विकासासाठी मागील काळात ६ कोटी आणि चालू १० कोटी १६ रुपये असे एकूण १६ कोटी रुपये मंजूर केल्याने येथील जनतेला दिलासा मिळाला आहे.
कोणतेही पद नसताना शिवसेनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीप्रमाणे राजू खरे यांनी निधी खेचून आणल्याने पुढील काळात संधी मिळाल्यास मोठा विकास खरे यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास येथील नागरिकांना वाटू लागला आहे.