आगामी निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशा पद्धतीने असेल लोकशाही टिकवणारे सरकार आणणे आवश्यक आहे. लोकशाहीने आपल्याला एका मताने देश चालवण्याचा अधिकार दिला आहे. तो वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
भाजपची पाच ते दहा वर्ष देशाला खड्ड्यात घालणारी आहेत. शेतकरी, मजूर, शेतमजूर, बेरोजगार या सगळ्यांनाघरी बसवण्याचे काम या पक्षाने केले. आमच्या काळात विविध रस्त्त्यांना मंजुरी मिळाली असून मात्र त्याचे उद्घाटन आता भाजप करत असल्याची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीवर केले. ते महाविकास आघाडी आयोजित संकल्प मेळाव्या प्रसंगी मंगळवार दि. १९ मार्च रोजी संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे बोलत होते.
भारतीय लोकशाही आणि राज्यघटना या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
यावेळी व्याख्याते निरंजन टकले म्हणाले की भाजप सरकारने
दिलेली आश्वासने आज तागायत पूर्ण केलेली नाहीत. भाजपच्या काळामध्ये महिला, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिन – दलित, पिछडावर्ग यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार झाले आहेत. अशाच नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांचे सत्कार करण्यात आले ही दुर्दैवी गोष्ट आहे. भारतीय संविधान पंतप्रधानांना कोणत्याच धार्मिक विधीसाठी
परवानगी देत नाही. मोदी यांनी उल्लंघन केले. दुसरीकडे संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन वेळेस राष्ट्रपतीला सुद्धा आमंत्रण दिले नव्हते. एकीकडे भाजपा सरकार चांगलं असल्याचा दावा व दुसरीकडे मात्र हिंसक वर्तन भाजपाचे आज देशात सुरू आहे. याचे बारकावे लक्षात
घेणे आवश्यक आहे. भाजप पक्षाने सर्वाधिक जास्त खंडणी पाकिस्तान मधील कंपनीकडून पक्षाला गोळा केली हेच आज आम्ही किती चांगले याचे खोटे दाखले देत मिरवत आहेत. आज पर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले. त्यांच्या काळामध्ये कधीच ५४ ते ५६ हजार कोटी रुपयांच्या
वरती देशाच्या कर्जाचा आकडा गेलेला नाही. परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यापासून २०० लाख कोटीच्या वर या पंतप्रधानांनी देशावरती कर्ज करून ठेवले आहे. हे देशवासीयांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
व याचा जाब येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारणे गरजेचे आहे. सरकारी
हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस, रेल्वे, रेल्वे स्टेशन, सर्व सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून ठराविक उद्योगपतींच्या हाती देण्यात आले आहेत.
आज हेच उद्योगपती सरकारला झुकवत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
यावेळी त्यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.
यावेळी माजी मंत्री सिद्राम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील, चेतन नरोटे,काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, राष्ट्रवादी नेते नंदकुमार पवार, नगराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसची माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे समीर कोळी, शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, सागर कदम, संदीप शिंदे, आदित्य फत्तेपूरकर आदी महाविकास आघाडीतील
नेतेमंडळी उपस्थित होते.