खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर परिचारकांच्या वाड्यावर.
पुढील रणनीती आणि प्रचार यंत्रणेवर चर्चा; खा. निंबाळकर यांची माहिती
पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभेची जागा साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून सुरू असतानाच अचानक माढा लोकसभेचे भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढ्याचे क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांची गुरुवारी पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी वाड्यावर भेट घेतली.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या कामानिमित्त मा.आ प्रशांत परिचारक हे बाहेर गावी असल्याने भेट घेऊन पक्षाची रणनीती ठरवणे व माढा मतदार संघाचा प्रचाराचा कार्यक्रम ठरवणे याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले.
त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना साताऱ्याची जागा बदलून माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिली जाणार नाही.
सध्या प्रसार माध्यमांमध्ये बोगस बातम्या चालवल्या जात आहेत.
प्रसार माध्यमांनी वृत्तवाहिन्यांनचा दर्जा राखावा.
पहिल्याच यादीत पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. मतदार संघात पक्षाची ताकद वाढली आहे. मागील लीड पेक्षा आगामी निवडणुकीत तीन लाखाच्या फरकाने निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले की
भाजपाने फडणवीस यांच्या माध्यमातून मोहिते-पाटील यांना विविध विकास कामांसाठी तसेच संस्थेला निधी उपलब्ध करून दिला आहे. मोहिते-पाटील यांनी पक्षाविरोधात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
यामुळे मोहिते-पाटील वेगळा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी फलटण येथे होणाऱ्या बैठकीत रामराजे निंबाळकर सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.