धनगर समाजातील २६ हजार बांधवांची मते जाणून घेत पक्षश्रेष्ठींकडे पाठवला अहवाल
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी गेली काही दिवसांपासून कार्यकर्त्यांची मोठ बांधून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केले आहे. आणि दोन दिवसांपूर्वी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीही जाहीर झाली आहे. मात्र भाजपाकडून अद्यापही सोलापूर साठी उमेदवार दिला नाही.सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडून अनेक जण इच्छुक आहेत.
यामध्ये धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने सोलापूर लोकसभा मतदार संघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
यावेळी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की
राज्यात एक तरी धनगर समाजाचा खासदार झाला पाहिजे अशी भूमिका राज्यातील धनगर समाजाची आहे. सोलापूर लोकसभा क्षेत्रातील मागील काही दिवसात २६ हजार धनगर समाजातील बांधवांची मते जाणून घेतली आहेत.
याचा अवहाल भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला असून
सोलापूर लोकसभा क्षेत्रात पाच लाखाहून अधिक धनगर समाजाची मते असल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी व्यक्त केली आहे.