शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भिंगे यांची निवड
राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात शिवा संघटनेचे काम अतिशय सुयोग्य पध्दतीने सुरू असून लिंगायत समाज बांधावांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग या माध्यमातून या समाजाच्या विविध प्रश्नासाठी शिवा संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोपविलेली जबाबदारी पार पाडू, शिवा संघटनेच्या पंढरपूर विभागात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे अशी माहिती नुतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय भिंगे यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शिवा संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस या शहर तालुक्यातील लिंगायत बांधवाच्या रोजगार, कला, क्रिडा आणि शिक्षण, आरोग्य या बाबीशी निवडीत विविध प्रश्नांना न्याय देण्याची, तरूणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, क्रिडा क्षेत्रात विशेष कौशल्यप्राप्त खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी उपायोजना करणे, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यासाठी सुयोग्य पाठपुरावा करण्याचे कार्य नुतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे व त्यांचे सहकारी सुयोग्य पध्दतीने करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी शिवा संघटनेच्या वतीने पंढरपूर विभागात समाविष्ट असलेल्या या पाचही तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असून गाव तिथे शिवा संघटनेची शाळा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवा संघटनेचे कार्य तळागाळा पर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आद्य समता क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या भुमीत महातमा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आली आहे. शासनस्तरावर याची घोषणाही झाली मात्र या स्मारकाचे काम अजुनही पुर्णत्वास आलेली नाही त्यासाठी ठोस पाठपुरावा करणे.राज्य शासनाने नुकतेच लिंगायत समाज बांधवांसाठी महामंडळाची घोषणा करून ५० कोटींचा निधी जाहीर केला आहे. राज्य भरात लिंगायत समाज घटकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या महामंडळास शासनाने जाहीर केलेला ५० कोटींचा निधी अतिशय त्रोटक असून किमान ५०० कोटींचा निधी देण्यात यावा या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, पंढरपूर समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी सांप्रदायाचे तिर्थक्षेत्र म्हणून जगविख्यात आहे. समतेच्या विचारांची क्रांतीकारक मांडणी ११ व्या शतकात केलेले महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक पंढरपूरातील यमाई तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर (आयलँन्डवर) व्हावे यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे. इयत्ता पाचवी ते दहाविच्या अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वर यांचे जिवनकार्य आणि चरित्र याची माहिती देणारा धडा समाविष्ट करण्यात यावा. लिंगायत धर्मात समाविष्ट असलेल्या अनेक जात समुहांचा अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश आहे. मात्र राज्यात अनेक भागात जात प्रमाणपत्र प्राप्त करताना या लिंगायत बांधवांना मोठ्या अडवणुकीचा, अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे यासाठी ठोस पाठपुरावा करणे, प्रसंगी आदोलन करणे. पंढरपूर शहरात लिंगायत दफ नभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्यानंतर लिंगायत समाज बांधवांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पंढरपूर येथील लिंगायत स्मशानभुमीत सोलापूर येथील लिंगायत स्मशानभुमी प्रमाणे सावलीसाठी व बसण्यासाठी निवाऱ्याची सोय करण्यात यावी. पंढरपूरातील दफन भुमीत दफन विधीसाठी खड्डा करताना मजुराकडून काम करून घ्यावे लागते. त्यासाठी खुप मोठी रक्कम मोजावी लागते व पावसाळ्याच्या दिवसात मोठा बिकट प्रसंग उभा राहतो. त्यामुळे सोलापूर येथील लिंगायत स्मशानभुमीप्रमाणे पंढरीतील लिंगायत स्मशानभुमीत मशीनव्दारे खुदाई (एक्सवेटर) करता यावी यासाठी पंढरपूर नगरपालिकेने विशेष आर्थिक तरतुद करून मशीनची सोय करावी.
यावरील व इतर अनेक महत्वपुर्ण मागण्यांसाठी, सामाजिक कार्यासाठी शिवा संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संपुर्ण भारतभर लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नासाठी व न्याय हक्कासाठी लढा देत आलेल्या, संघर्ष करीत आलेल्या शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी (पंढरपूर विभाग) पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय भिंगे यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर पोंडे यांच्या हस्ते नुकतेच बारामती येथे आयोजीत मेळाव्यात राजेंद्र भिंगे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराय कल्लावर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. आ. शिवशरण आण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शैलेश जटापुरे, प. महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, जिल्हा सचिव महांतेश पाटील, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष नागप्पा कोपा हे उपस्थित होते.
याबाबत सोमवार दिनांक 25 मार्च रोजी पंढरपूरात शिवा संघटनेच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत या निवडीची माहिती देण्यात आली.