समाजसेवक संजयबाबा ननवरेंची आमदार समाधान आवताडे यांच्याकडे मागणी
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राज्यभरातील भाविक चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. मात्र नवीन बंदारा ते संत पुंडलिक मंदिरापर्यंत अहो रात्र सुरू असलेला अवैद्य वाळू उपसा होत असल्याने आबाल वृद्ध भाविकांना व पंढरपुरातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
काही दिवसापूर्वी वाळू उपसा करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर काही दिवसात
पंढरपूर शहरातील अनिल नगर -डोंबे गल्ली येथील भारत भादुले यांचे चिरंजीव कै.यश भादुले यांचे बंधाऱ्या जवळ अवैद्य वाळू उपसा करताना पाडण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याबाबत समाजसेवक संजय बाबा ननावरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना बंधाराचे पुंडलिक मंदिरापर्यंत अवैद्यरीत्या सुरू असलेल्या वाळू उपशामुळे अनेक भाविकांना तसेच पंढरपुरातील नागरिकांना जीव गमवावा लागल्याने चंद्रभागा वाळवंटात होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवावा अशी आग्रही मागणी आमदार आवताडे यांच्याकडे ननवरें यांनी केली.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी भादुले परिवारातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेऊन मानसिक आधार दिला.
अतिशय उमद्या आणि कर्तबगारी कालखंडात कै.यश यांच्या जाण्याने भादुले कुटुंबाच्या पारिवारिक आनंदामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून आम्ही त्यांच्या दुःखात सामील असून या दु:खातून सावरण्याचे त्यांना श्री पांडुरंग कृपेने बळ प्राप्त व्हावे अशी शोकभावना आमदार समाधान अवताडे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी समाजसेवक संजयबाबा ननवरे,प्रसाद भैया कळसे, भास्करदादा जगताप, पांडुरंग वाडेकर,सुरज राठी आदी उपस्थित होते.