माळशिरस मध्ये भाजपा आमदार राम सातपुते यांचे शक्ती प्रदर्शन
भाजपाला मतदान करण्यासाठी केले आवाहन
पंढरपूर /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच माळशिरस येथील त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, संस्कृतीताई सातपुते उपस्थित होत्या.
यावेळी मोठ्या संख्येने आमदार सातपुते समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सातपुते म्हणाले की पक्षाने संधी दिल्यानंतर माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तालुक्यातील रस्ते,वीज,पाणी आणि आरोग्याच्या सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले असून खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून २२ गावचा पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगत
पुढील काळात रेल्वे मार्ग उभारण्यासाठी, पंचतारांकित एमआयडीसी उभारण्यासाठी आणि कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी जे मागील ७० वर्षात काम झाले नाही ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला मतदान करण्याचे भावनिक आवाहन आमदार राम सातपुते यांनी केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेले राम मंदिर, ३७० कलम हटवणे तसेच देशात झालेल्या विविध विकास कामांना उजाळा देत सोलापूर लोकसभा सुमारे अडीच लाख मताधिक्याने आपण निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काम केले असल्याचे सांगितले. पुढील काळात माळशिरस तालुक्यातून रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात विकास कामे करणारा असल्याचे आश्वासन देत पुढील कार्यासाठी आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा दिल्या.