एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल…. अशाच पद्धतीने भाजपा उमेदवाराचे काम सुरू असल्याची सर्वत्र चर्चा
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी मंगळवारी पंढरपूर शहर व तालुक्यातील गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली.
यावेळी त्यांनी तावशी, बोहळी, गादेगाव, इसबावी, कासेगाव येथे गाव भेट दौरा केला. यावेळी त्यांनी कासेगाव येथे आले असता त्यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेत तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती दूरध्वनीद्वारे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्याने एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दिलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठीचा निधी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ, हर घर नल योजनेतून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम केल्याचे सांगत त्यांनी मागील दहा वर्षाच्या काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला.
यावेळी त्यांच्यासोबत युवक नेते प्रणव परिचारक, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख, विठ्ठलचे माजी संचालक विजयसिंह देशमुख, माऊली हळनवर, सुभाष मस्के यांच्यासह कासेगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.