पंढरपूर येथे युवा सेनेचा संवाद मेळावा संपन्न
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे युवा सेनेच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन मोरे भक्त निवास सांगोला चौक पंढरपूर येथे करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्यात शिवसेनेचे संपर्क नेते संजय मशिलकर यांनी युवा शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती देत सोलापूर आणि माढा येथील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी महायुतीचे उमेदवार विश्वासात घेत नसल्याचे खंत व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीचा धर्म पाळला जाईल असे सांगत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना पंढरपूर शहर यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी लोकसभा
संपर्कप्रमुख महेश साठे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ बडवे, युवा सेना शहर संघटक सनि आसंगे, शहर उपप्रमुख महबूब नदाफ, आकाश सगर, गणेश चव्हाण, कॉलेज कक्ष तालुकाप्रमुख करण नागणे, युवा सेना तालुका उपाध्यक्ष विश्वजीत नागटिळक, सौरभ सुरवसे, तुषार धायगुडे, यश गलांडे यांच्यासह युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे उपस्थित होते.