करकंब येथे पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी साधला संवाद
पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करकंब येथे पांडुरंग परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी विचार विनिमय बैठकीचे आयोजन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे . पुढील काळात विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा आदेश असल्याचे समजून कामाला लागावे असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी
पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास सर्वच भागात स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या विचाराचा प्रभाव आहे. महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांना निवडून आणण्याचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निर्धार केल्याने याचा निश्चितच महायुतीच्या उमेदवारास फायदा होणार आहे.