रामभाऊंसोबत विकासावर चर्चा करण्यासाठी एकवटले शेकडो सोलापूरकर
सोलापूर / प्रतिनिधी
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकवेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते. यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकर बाग आणि वाल्मिकी उद्यान येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांची थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावे, आयटी पार्क, टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्क व्हावे, सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले.
यानंतर आमदार राम सातपुते यांनी वाल्मिकी उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यवसायिक, उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. सोलापूरचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या आणि विकास कामाचा अनुभव असलेल्या आमदार राम सातपुते यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अबकी बार चारसो पार अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते.