आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची केली होती मागणी
पंढरपूर/प्रतिनिधी
भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र, नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज 6 तास वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले. मात्र, पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीजपुरवठा केला जात होता. त्यामुळे शेती पिकं जळू लागली होती. यामुळे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठचा वीजपुरवठाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.
*जिल्हाधिकाऱ्यांना लिहले होते पत्र-*
भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून 8 तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या गावात सुरू होणार वीज पुरवठा
वीज पुरवठ्याचे तास वाढवण्या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महवितरणचे अधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून भीमा नदीकाठावरील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची सूचना केली. त्यामध्ये भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील गुरसाळे, पंढरपूर, उचेठाण, औज व चिंच हिळळी या सहा बंधा-यावरील कृषी पंपाचा विदयुत पुरवठा फक्त 2 तासापार्यंतच चालू ठेवण्यात येणार आहे. तर इतर बंधा-यावरील कृषि पंपाचा विदयुत पुरवठा आठवडयातून एक दिवस महावितरण विभागाच्या देखभाल (maintenance) करीता पूर्णवेळ खंडीत कऱण्यात यीमर आहे. इतर दिवशी 6 तास चालू ठेवण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
प्रणिती शिंदेंच्या कामाला सलाम
प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्यचे आमदार आहेत, असे असताना त्यांनी भीमा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरत वीज पुरवठ्याचे तास वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यांच्या पत्राची दखल घेत भीमा नदीकाठचा वीजपुरवठा सहा तास करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा कोरे या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून मतदारांनी त्यांच्या कामाला सलाम ठोकण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठया प्रमाणात वाढली आहे. तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. या परिस्थितीत पिकांना झळ बसत असताना, उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्याने नदीकाठचा वीजबंदचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.
सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. आता वीजपुरठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.