हुकूमशाही माजवणाऱ्या भाजपाला हद्दपार करण्यासाठी साथ द्यावी; शिंदे यांचे आवाहन
पंढरपूर/ प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर तालुक्यातील गाव भेट दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विविध ठिकाणी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी प्रणितीताई शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार अनेक ठिकाणी करण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील गाव भेट दौऱ्यादरम्यान प्रणितीताई शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी माझा लढा असून हुकूमशाही माजवणाऱ्या भाजपाला हद्दपार करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या लढ्यात सर्वांनी साथ द्यावी. असे आवाहन नागरिकांना केले.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.