पंढरपूर तालुक्यातील गाव भेट दौऱ्यानिमित्त धैर्यशील माहिती पाटील यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद
पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभा निवडणुकीबाबत पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी-धोंडेवाडी, सुपली, पळशी,उपरी, खेडभाळवणी, शेळवे, भंडीशेगाव, भाळवणी, केसकरवाडी शेंडगेवाडी या गावचा सोमवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी गाव भेट दौरा केला.
या गाव भेट दौऱ्यास विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी मोहिते-पाटील यांचे स्वागत केले जात असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून तुतारी घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे केली जात आहे. याबाबत पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनतेची मागणी घरातील वरिष्ठांकडे पोहोचवणार असून लवकरच जनतेच्या मनातील निर्णय मोहिते-पाटील कुटुंबीयांकडून घेतला जाईल. जनतेला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. असा विश्वास उपस्थित ग्रामस्थांना दिला. यावरूनच पुढील काळात भाजपा विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान पाहावयास मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.