सोलापूर / प्रतिनिधी
हिंदूंना आतंकवादी म्हणून हिंदू समाजाचा अपमान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. हा अपमान हिंदू समाज विसरणार नाही, अशी सडकून टीका भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.
आमदार राम सातपुते यांनी गांधीनगरजवळील निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारून विधिवत पूजन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार राम सातपुते म्हणाले सोलापूरकरांच्या कल्याणासाठी आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली सोलापूरच्या विकासासाठी तन-मन धन समर्पित करून काम करण्याचा संकल्प केला आहे. सोलापुरातील युवकांना याच ठिकाणी नोकरी मिळावी, टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्क, सोलापूरची विमानसेवा सुरू करणे याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येणार आहे. आम्ही सोलापूरकरांना दररोज पाणी देण्याचा संकल्प केला असून येत्या काळात हा संकल्प पूर्ण होणार आहे, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.
विरोधक हिंदू धर्म मानतात का, हाच मोठा प्रश्न आहे. विरोधी उमेदवारांचे वडील माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना आतंकवादी म्हटले होते. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. जो भगवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांवर डौलाने फडकवला, जो भगवा साधूसंत परिधान करतात अशा भगव्याला काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी दहशतवादी म्हटले. यापूर्वी भगव्याला आतंकवादी म्हणण्याची पाळी आज पत्रकार हिंमत कोणामध्येही नव्हती. भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना सोलापूरकर जनता नक्कीचधडा शिकवेल, असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले.