महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख बुधवारी दक्षिण सोलापूर विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर
सोलापूर / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील भाजप विरुद्ध काँग्रेस असा राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षासह विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख बुधवारी दक्षिण सोलापूर विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर होते.
यावेळी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होटगी येथील काँग्रेसच्या उषादेवी दत्तात्रय चाबुकस्वार यांच्यासह असंख्य महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला. तसेच यत्नाळ येथील लक्ष्मी स्वामी, भाग्यश्री कामशेट्टी, होटगीतील रामेश्वरी औटगे, सुजाता तळ्ळे, बोरुळमधील अनिता गायकवाड, निगव्वा चिमेकर, शिरवळ गावातील सपना जवळगी, होटगी स्टेशनमधील सविता सुकाळे, मीनाक्षी निंबाळकर, वैशाली ढेरे, शुभांगी डांगे तर कणबसमधील सिद्धम्मा स्वामी, अश्विनी स्वामी, विजयालक्ष्मी चिट्टे, राणी चिट्टे, भौरम्मा अविनाळे यांनीही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.