पत्रके वाटून महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे केले आवाहन
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीतील
भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये ‘होम टू होम’ प्रचार केला. घरोघरी जाऊन, पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बनशंकरी नगर, शिवसृष्टीनगर, महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, प्रकाश हत्ती, कल्पना कारभारी शालन शिंदे, चंद्रकांत रमणशेट्टी, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, धोंडप्पा वग्गे, राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव, आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे, गुरूनाथ वांगीकर, नागेश उंबरजे, धरीराज रमणशेट्टी, उद्योजक प्रमोद मोरे, उमेश कोळेकर, राहुल शबादे, मल्लू कोळी, विशाल शिंदे, ऋषीकेश कुलकर्णी आदि उपस्थित होते.