आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार
सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचे काम करत असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दमदाटी केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते असलेल्या स्वातंत्र्यसैनिक नगर, कर्णिक नगर परिसरातील बाबुराव क्षीरसागर यांना फोन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी दमबाजी केल्याचे नुकतेच उघड झाले होते. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रचंड व्हायरल झाली.
“काय नाटक चालू आहे तुमचं ? हिंमत असेल तर मला येऊन भेटा. सहा महिन्यांत तुमचा संपर्क नाही. आमच्या अडचणीच्या काळात तुम्ही दिसतच नाही. मला कोणाला विचारण्याची गरज नाही. स्टंटबाजी करु नका”, अशा प्रकारे आमदार प्रणिती शिंदे यांनी बाबुराव क्षीरसागर यांना बोलल्याचे व्हायरल झालेल्या ऑडिओ तून दिसत आहे. या प्रकारानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाराज होऊन काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव क्षीरसागर, सुशील नाटकर आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी अजिंक्य कटाप, सुदर्शन क्षीरसागर, देविदास शिंदे, अमोल जाधव, गणेश साळुंके, चंद्रशेखर सरवदे, विकास धायफुले, अमित हिबारे, श्रेयस कटारे, साईनाथ क्षीरसागर, अक्षय कारंजे, योगीनाथ मिनकेरी, बालाजी मिनकेरी, गणेश बनसोडे, राकेश यन्नम, आदित्य पुकाळे, विनय हंचाटे, रोहन पतंगे, शार्दुल कोठे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.