सोलापूर/प्रतिनिधी
संविधान बदलण्याची भाषणे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जे संविधानविरोधी आहेत, त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून चळवळ सुरू केली पाहिजे, असे आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, एकंदरीतच सोलापुरात सध्या शेतकऱ्यांचा विषय तीव्र झालेला आहे. आज जीएसटीचा विषय आहे, दुधाला दर नाही आणि पाणी नाही, हे सर्व असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे, तो दिसून येत आहे. हे विषय सोडवण्यासाठी जे जे काही लागेल ते सर्व काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे, तसेच जाहीरनाम्यात महिलांबाबत शेतकऱ्यांबाबत, युवकांबाबत चांगल्या योजना आहेत. जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल असे अनेक चांगले विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घेण्यात आल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.
यावेळी माननीय सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती ताई शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, सुरेश हसापुरे, विनोद भोसले, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगोळे, सुशीला आंबुटे, मधुकर आठवले, नागनाथ कदम, भोजराज पवार, नरसिंह असोदे, अनिल मस्के, बसवराज म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, श्रीकांत दासरी, नागेश म्हेत्रे, लखन गायकवाड, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, अंबादास गुत्तीकोंडा, सुहास जाधव, बालाजी जाधव, अनुपम शहा, सुभाष वाघमारे नागनाथ शहाणे, उमेश सुरते, संजय गायकवाड सुरेश पाटोळे धीरज खंदारे चंद्रकांत हिवसे, हेमा चिंचोळकर चंदा काळे शुभांगी लिंगराज, बिराजदार, कांबळे, शंकर नरोटे पृथ्वीराज नरोटे, गौतम मसलखांब, बापू घुले, पंडित गणेशकर, व्यंकटेश भंडारे, हाजी शेख, अभिलाष, मोहसीन फुलारी बालाजी जाधव ,विवेक इंगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.