डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार राम सातपुते यांनी केले अभिवादन
सोलापूर / प्रतिनिधी
उपेक्षित, दीनदलित समाजावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच दीनदलित समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात आहे, असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा निवडणुकीतील भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन केले. यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख , भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. राम सातपुते म्हणाले, कोट्यावधी लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. दीनदलितांना विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मार्गदर्शक ठरत आहे. एका चहावाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान होणे, माझ्यासारख्या एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार होणे आणि आता खासदारकीचा उमेदवार होणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करून भारताच्या विकासाचा वचननामाच दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या प्रवासातील हा मैलाचा दगड आहे, असेही आमदार राम सातपुते यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्हा कार्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, प्रा. नारायण बनसोडे, अनु. जाती अध्यक्ष मारेप्पा कंपली, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महिला आघाडी अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेविका संगीता जाधव, भाजपा शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, श्रीनिवास करली, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुनिल गौडगांव, भाजपा भटके विमुक्त विकास युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बाशाभाई शेख, मंडल अध्यक्ष गिरीष बत्तुल, आनंद बिराजदार, अर्जुन जाधव, महेश देवकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, सुजित चौगुले, लक्ष्मी नडगिरी, विठ्ठल बडगंची, भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा शहर सोलापूर अध्यक्ष मारेप्पा कंपल्ली, सरचिटणीस महेश बनसोडे, प्रविण कांबळे, आनंद गोडलोलु, राजाभाऊ माने, बाबुराव संगेपाग, राजकुमार निकंबे, गौतम कसबे, शिवानंद वडतिले, अर्जुन जाधव, अविनाश बेंजरपे, संतोष कदम आदी उपस्थित होते.