धैर्यशील मोहिते-पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार
पंढरपूर/ प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर मंगळवारी सायंकाळी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होते. धैर्यशील यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने
उमेदवारी दिली नसल्याने मोहिते पाटील गट नाराज झाला होता. यानंतर गाव भेट दौऱ्यानिमित्त समर्थकांची भूमिका जाणून घेतली यावेळी त्यांना बहुतांश समर्थकांनी तुतारी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर मोहिते पाटील यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रघुनाथराजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बळीराम काका साठे, अभिजीत पाटील, बाबासाहेब देशमुख, संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, नारायण पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. मोहिते पाटील यांची उमेदवारी म्हणजे सर्वसामान्य जनतेची मनातली उमेदवारी आहे. यामुळे यंदा बदल अपेक्षित आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली असे रघुनाथराजे निंबाळकर यांनी सांगितले. आपण सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना विजयी करू, असे आवाहन यावेळी करण्यात आले.