माढा,सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार
पंढरपूर येथे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पंढरपूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पार पडली.
यावेळी बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विना अट पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत माढा आणि सोलापूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष सोलापूर जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष सौ भारतीताई चौगुले, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, सांगोल्याचे शाहूराजे देशमुख, महेंद्र पवार, मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे, बालाजी पवार, संतोष जाधव, बाबासो लिगाडे, अनिल केदार, रामचंद्र सरगर, विजय मोरे, विद्यार्थी सेना सांगोला तालुका अध्यक्ष अभिजीत चव्हाण, सांगोला मनसे प्रसिद्धीप्रमुख खंडू इंगवले, मनसे सरकार सेना शहराध्यक्ष गणेश गायकवाड, चैतन्य विधाते, पुनम विधाते, सौ.रंजन इंगवले, हर्षवर्धन शिंदे, संकेत सरगर, विनोद बाबर, अविनाश बनसोडे, देवदत्त पवार, मारुती वाघमारे, नारायण गोवे, आबासाहेब जगताप, बाळासाहेब गोपाळवीर, श्रीकांत चव्हाण, सचिन कणसे, सतीश फंड, किसन पाटील, करण आलाट, राहुल सुर्वे, संजय घोलप, शंकर खांडे, स्वप्निल नागणे, स्वप्निल जाधव, विठ्ठल जाधव, स्वप्निल कोळी, निलेश जगताप, निलेश सोनवणे, लखन पारसे, सुरज कदम, अनिकेत जाडकर, सुरज पवार, सचिन पवार, दिगंबर शिंगाडे, नागेश इंगोले यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.