माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसींची मोठी संख्या असल्याने विजय निश्चित हाके यांनी व्यक्त केली विश्वास
पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. यामुळे धनगर समाजाला येथील उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख यांच्याबरोबर चर्चाही झाली होती. मात्र माझे हाके आडनाव असल्याने माझे तिकीट कापले गेले असल्याचा आरोप पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार निंबाळकर आणि आघाडीचे उमेदवार मोहिते-पाटील यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत बाबा चव्हाण, प्रशांत रुपनवर, सागर गोडसे, नवनाथ शिंदे उपस्थित होते.
लक्ष्मण हाके हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.
यामुळे त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की राज्यकर्त्यांकडून ओबीसी बांधवांचा मतासाठी वापर केला जात आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यात कमी पडणाऱ्या गप्प बसणाऱ्या उमेदवाराला महायुतीने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून गुन्हे दाखल असलेल्याला उमेदवारी दिली असल्याचे सांगत दोन्ही पक्षावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवांची सुमारे 13 लाख मतदारांची संख्या असताना
मात्र ओबीसी बांधवांना जाणून बुजून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही असा आरोप केला .
यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी माझ्याकडे आग्रह धरला असून आर्थिक मदत केली जात आहे. असे सांगत मतदार संघातील ओबीसींची संख्या पाहता आपणाला संधी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत केला आहे.