सांगोला तालुक्यातील कोळा येथील सभेत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना विश्वास
सांगोला/ प्रतिनिधी
माढा लोकसभेच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील कोळा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र शासनाच्या गलथान धोरणामुळे शेतीमालाला भाव नाही,शेतकरी खचत आहे,पिचत आहे.शेतकऱ्यावर जीएसटी सारखे जोखड लावल्याने शेतकर्याची परीस्थिती गंभीर होत चाललेली आहे.शेतकऱ्याचा,तुमचा आवाज संसदेत पोहचवणे गरजेचे आहे. मी देशाच्या संसदेत शेतकऱ्याचे प्रश्न उपस्थित करून आपला आवाज नक्कीच बनेन असे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी जनतेला सांगितले.
निष्क्रिय खासदारामुळे आपल्या सांगोला तालुक्याचा आपल्या गावाचा विकास खंडित झालेला आहे. सांगोला तालुक्याचा विकासाचा रथ पुन्हा फिरता करण्यासाठी आपण मला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळेस सोबत ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड डाॅ.बाबासाहेब देशमुख,डाॅ.अनिकेत देशमुख,प्रा.झपके सर,माजी जि.प सदस्य गजेंद्र कोळेकर,दादासाहेब बाबर,मार्केट कमिटीचे चेअरमन समाधान पाटील,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव,उपसरपंच सादिक पटेल,कुंडलिक अलदार,मारूती सरगर,अरविंद पाटील,नारायण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.