धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार यांनी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे जाहीर सभा
माढा/प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार यांनी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे जाहीर सभा घेतली.
सोलापूर जिल्ह्याच्या जनतेचा स्वाभिमान जपण्यासाठी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे.पुन्हा शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला बनवून दाखवू असे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.
तसेच यावेळेस शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज आपला माणूस धैर्यशिल मोहिते-पाटील यांना तुतारी वाजवणार माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून संसदेत पाठवण्याचे आवाहन केले.
यावेळेस माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे,प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील,उत्तमरावजी जानकर,शिवाजीनाना कांबळे,माढ्याचे नगराध्यक्ष मिनलताई साठे,अभिजीत आबा पाटील,संजय कोकाटे,संभाजी शिंदे,साईनाथ अंभगराव,संजय पाटील घाटणेकर,दादासाहेब साठे,धनंजय डीकोळे,हरिदास रणदिवे,बाबाराजे देशमुख,शेखर माने,नागेश फाटे,मोडनिंचे सरपंच बाबुराव सुर्वे,भारत नाना पाटील,आशाताई टोणपे, adv.जगदाळे,वर्षा क्षिरसागर,सुवर्णा शिवपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते