माण/प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील माण तालुक्यातील वावरहिरे येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ काॅर्नर बैठक संपन्न झाली.
यावेळी नेते मंडळींनी उपस्थित जनतेला निष्क्रिय खासदारला कायमचा घरी बसवण्यासाठी
यावेळेस तुतारी वाजवणार माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून धैर्यशिल मोहिते-पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार तुकाराम तुपे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई,अभयसिंह जगताप,महिला प्रदेशाध्यक्ष कविता म्हेत्रे,माजी जि.प.अध्यक्ष सुभाषराव नरळे,शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष संजय भोसले,माजी जि.प.सदस्य दिलीपराव तुपे,माजी सभापती श्रीराम पाटील,मोहनराव देशमुख,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष एम.के.भोसले,काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,माजी उपसरपंच शंकरराव तांबवे व इतर मान्यवर उपस्थित होते.