पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर महविकास आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे आणि माढा मतदार संघाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रचारार्थ पंढरपूर येथे उद्या सायंकाळी ६वाजता मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नेते आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
उद्या दिवसभर खा. शरद पवार यांच्या सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा होणार आहेत. या पंढरपूर येथील सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सोलापूर आणि माढा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.असे आवाहन महाविकास आघाडीचे वतीने करण्यात आले आहे.