महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन : दिलीपबापू धोत्रे
पंढरपूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा दिला आहे.
याबाबत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायं.६ वाजता मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सभेस राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते, याचबरोबर मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आमचे नेते राज साहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा दिला आहे.
यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेनेचे दिलीप धोत्रे यांनी केले आहे.