महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंढरपुरात मनसेची जाहीर सभा संपन्न
पंढरपूर / प्रतिनिधी
उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या महायुतीच्या पंढरपूर येथील प्रचार सभेत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार राम सातपुते, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका पमुख शशिकांत पाटील, शहरप्रमुख संतोष कवडे, यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विना अट पाठिंबा दर्शवलेला आहे. मोदी सरकारने केलेल्या कार्याला पाठिंबा देत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे ठरवलेले आहे.
मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असलेले राम मंदिर, त्याचप्रमाणे 370 कलम हे हटवून त्यांनी खूप मोठे आणि चांगले काम केलेले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना जाचक असलेला तीन तलाक या कायद्या रद्द केला आहे .या सर्व गोष्टीचा विचार करून भारत देशाला जागतिक स्तरावर उच्च पदावर नेण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकतात. म्हणून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मनसेच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे. असे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचार सभे मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.