महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मनसे नेते दिलीपबापू धोत्रे
पंढरपुरात मनसेच्या वतीने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार सभा संपन्न
पंढरपूर /प्रतिनिधी
गेली दहा वर्षात भाजपा सरकारने मोठे काम केले आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलेले आहे. विस्थापितांचे भलं करण्यासाठी भाजपाचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे.
भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला आहे.
तर हे काँग्रेस म्हणते चुकीची कारवाई हे सरकार करत आहे. असे खोटेनाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमध्ये करत आहे. असा आरोप आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केला.
यावेळी व्यासपीठावर मनसे नेते दिलीप धोत्रे, आमदार राम सातपुते यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले की तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील नागरिकांना करवाढ करू नये यासाठी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेऊन तसा आदेश काढण्यात आला. पुढील काळात करवाढ लादली जाणार नाही. जनतेला विश्वासात घेऊन पंढरपूरचा कॅरीडॉर बाबत निर्णय होईल असा विश्वास पंढरपुरातील नागरिकांना त्यांनी दिला.
यावेळी बोलताना मनसे नेते दिलीपबापू धोत्रे म्हणाले की उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येथील असा विश्वास व्यक्त केला.
दिलीपबापू धोत्रे पुढे बोलताना म्हणाले की राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विना अट आपला पाठिंबा दिला आहे. मोदीना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे ठरवलेले आहे.
मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असलेले राम मंदिर, त्याचप्रमाणे 370 कलम हे हटवून त्यांनी खूप मोठे आणि चांगले काम केलेले आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून भारत देशाला जागतिक स्तरावर उच्च पदावर नेण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकतात. म्हणून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मनसेच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे. असे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी प्रचार सभेत मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले की प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्याच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे. असे वक्तव्य राम सातपुते यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना केले.
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग बनवले आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरी बांधून दिले आहेत. यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर मनसेचे जिल्हा तालुका आणि शहर भागातील प्रमुख पदाधिकारी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.