पंढरपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विचारविनिमय बैठक संपन्न
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंढरपूर येथील मोरे भक्त निवास येथे पदाधिकारी, कार्यकर्ता विचार विनय बैठक व महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी बोलताना सांगितले की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खारीचा वाटा असेल असा विश्वास दिला.
यावेळी व्यासपीठावर सौ.सांस्कृतीताई राम सातपुते, कल्याणराव काळे, बी.पी रोंगे सर,युवक नेते प्रणव परिचारक, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, साधनाताई राऊत, विश्रांती भुसणर, श्रीकांत शिंदे, अनिल नागटिळक, महादेव देठे, संकेत ढवळे, संजय म्हमाने, सुरज पेंडाल, शुकुर बागवान, ओम कदम, चैतन्य रणदिवे, सिद्धू चव्हाण, आदित्य पिसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.