प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यात गाव भेट दौरा
मोहोळ/प्रतिनिधी
भाजपमुळे सोलापूरचे मागच्या दहा वर्षात नुकसान झाले आहे. महागाई वाढलेली आहे ते म्हणाले होते दोन कोटी मुलांना नोकरी देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली नाही. ते म्हणाले होते पाणी देऊ, पण सध्या मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की, टँकरशिवाय पाणीपुरवठा होत नाही. दरम्यान त्यांचे रस्ते त्यांना दिसत आपल्या येथे खड्ड्यात रस्ते, की रस्त्यात खड्डे काय कळत नाही. तर सोलापुरात शेवटचा उद्योग आलेला एनटीपीसी हा होता अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यात गाव भेट दौरा केला. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. प्रणिती शिंदे यांनी आज क्रांतीनगर, गुलशन नगर, कुरेशी गल्ली, महबूब सुभानी दर्शन, गौतमारती चौक, सिद्धार्थनगर, कोळेगाव, घाटणे, सिद्धेवाडी या ठिकाणी दौरा केला. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, विमान सेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली मात्र अद्यापही विमानाचे नामोनिशाण दिसत नाही. जीएसटीचा राक्षस तुमच्या डोक्यावर, उरावर बसलेला आहे. नोटबंदीमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपने मागच्या दहा वर्षात खोटे बोलणे रेटून बोलणे याच्याशिवाय काहीही केले नाही, त्यामुळे यावेळेस आपल्याला बदल करायचा आहे असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले.
दरम्यान, मी काम करते दुसरे काहीही करत नाही. मी पंधरा वर्षे कामावर निवडून आलेले आहे. भाजपात फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतो. दरम्यान, माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा देण्याची जाहीर केले त्यावेळी सभेमधील 80 टक्के लोक उठून गेल्याचे यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.
यावेळी दीपक मेंबर गायकवाड, शाहीन शेख, शिवसेना नेते सीमाताई पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.