पंढरपूर /प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी बंडू दिगांबर पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांचे हस्ते करण्यात आला.
बंडू दिगांबर पवार हे खेडभोसे येथील रहिवाशी असून त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. कोरोना काळात त्यांनी अनेक निराधार यांना आधार देवून सामाजिक कार्य केले असून त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देखील मिळाला आहे. पवार यांचे संघटन कौशल्य चांगले असून त्यांच्या मनमिळावू स्वाभावामुळे आज अनेक कामगार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगीतले.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, आप्पासाहेब नलवडे, अनिल नागटिळक, विकास पवार, प्रताप थोरात , नितिन देवकर उपस्थित होते.