पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्ह्याचे नेते कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, श्रीकांत शिंदे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पंढरपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर तालुका कार्यकारिणी तसेच युवा गर्जना सामाजिक संघटना तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी साहिल शेख, कार्याध्यक्षपदी विजय सुतार, उपाध्यक्षपदी समर्थ साळुंखे, सरचिटणीस पदी प्रशांत शेंडगे, सचिव पदी रवींद्र गव्हाणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाधान काळे म्हणाले की नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू म्हणून काम केले पाहिजे. उपेक्षित, पीडित, वंचित नागरिकांना न्याय देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कामातून युवकांनी आपले अस्तित्व निर्माण केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा गर्जना सामाजिक संघटनेच्या पंढरपूर तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये युवा गर्जना सामाजिक संघटना पंढरपूर तालुका अध्यक्षपदी विश्वास सुरवसे, उपाध्यक्षपदी विकास नागटिळक, अक्षय पवार, समाधान शिंदे तर कार्याध्यक्षपदी गणेश जमदाडे, विकास केसकर, सचिवपदी वैभव पाटील, सहसचिवपदी अशोक काळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनाथ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, अमर सूर्यवंशी, सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.